मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामाजिक चिंतन

  धर्म आणि विज्ञान ही दोन्ही मानवी प्रज्ञेची अपत्ये आहेत. प्रज्ञेचा विकास झाल्यामुळे मानवास, भूत-भविष्याची जाणीव, अज्ञाताची भीती, मृत्यूची भीती, सभोवतालच्या निसर्गाची भयावह अभिव्यक्ती व सर्व गोष्टींचे नियमन-निर्मिती ह्याविषयीचे प्रश्न पडण्यास सुरवात झाली. परंतु ह्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याएवढे ज्ञान मात्र मानवाकडे नव्ह्ते. त्यावेळी धर्माने बाळबोध उत्तरे पुरवत त्याची जिज्ञासा पूर्ती करण्याचा प्रयत्न केला. पुढे हळूहळू मानवी निरीक्षण शक्ती व तर्कशक्ती प्रबळ होत गेली आणि विज्ञानाचा विकास सुरु झाला. ज्या  प्रश्नांची उत्तरे धर्माने कल्पनेने दिली होती ती विज्ञानाने प्रत्यक्ष पुराव्यांच्या  आधारे द्यायला सुरुवात केली. परंतु धर्माने पुरवलेला मानसिक आधार देणे विज्ञानाला अजून जमलेले नाही. त्यामुळेच आजतागायत धर्म टिकून आहे.   धर्म टिकून राहण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. १) अज्ञाताच्या भीतीवर सोपे तोडगे २) सुखी जीवन जगण्याचे सोपे मार्ग ३) जीवनातील दुखांतून मुक्ती व मोक्षाचा मार्ग ४) मृत्यू नंतरच्या जीवनाचे व आत्म्याच्या अमरत्वाचे आश्वासन ५) मानवाच्या व व...