सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात. मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामक...
हा ब्लॉग विवेकी विचार करण्यास मदत करेल. तुम्हाला येथे विज्ञान, धर्म, राजकारण ह्याविषयी लेख वाचता येतील. - फ्रान्सिस आल्मेडा.