मी एकटा आहे ही भावना प्रत्येक माणसात असते.ती घालवण्यासाठीच माणूस दुसऱ्यांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतो.त्यातूनच सण, समारंभ,कार्यक्रम व कर्मकांड निर्माण झाली आहेत. आईच्या गर्भात एका पेशीपासून आपली निर्मिती सुरू होते.आणि आपल्याला जाणीव होते तोपर्यंत आपला एकटेपणा स्पष्ट होत जातो.जन्माला येताना काही वेळा जुळे जन्माला येत असले तरी प्रत्येक जण एकटाच असतो.प्रथम आपल्या सोबतीला असते ती आपली आई.त्यानंतर येतात ते आपले बाबा.त्यानंतर भावंडे,मित्र, मैत्रिणी,बायको,मुले,नातवंडे व शेवटी आपण एकटेच सजीवता सोडून निर्जीवते कडे जातो. आपले माणूस म्हणून अस्तित्व संपते.आपल्या जवळच्या लोकांच्या सहवासात आयुष्यभर असलो तरीही आपला आतला एकटेपणा आपण टाळू शकत नाही.त्यासाठी आपण सोबतीला देवाला घेत असावे.कारण आपण आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या देवाला आपल्या आत घेऊ शकतो. म्हणजे देवावरील भक्ती एकटेपणा घालवण्याची एक युक्ती आहे. परंतु ती काल्पनिक गोष्ट आहे हे आपल्याला पूर्णपणे ठाऊक असते.ज्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याने व कल्पकतेने आपण आपल्या मनात देवाची निर्मिती करतो ती आपली प्रतिभा आपल्या सोबत आपल्या जाणिवेच्या काळात सतत...
हा ब्लॉग विवेकी विचार करण्यास मदत करेल. तुम्हाला येथे विज्ञान, धर्म, राजकारण ह्याविषयी लेख वाचता येतील. - फ्रान्सिस आल्मेडा.