एडवर्ड डी बोनो या मनोवैज्ञानिकांने तयार केलेली चर्चा किंवा विचार करण्याची ही पद्धती सिक्स थिंकिंग हॅट्स नावाने ओळखली जाते. या पद्धतीमध्ये एकमेकाशी वादविवाद करणे किंवा दुसऱ्यांची मुद्दे खोडणे आणि त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यावर भर असतो. या पद्धतीने विचारविनिमय केल्यास आपण एकमेकांची मने न दुखावता कमीत कमी वेळात योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो असा डॉक्टर बोनो यांचा दावा आहे. या पद्धतीमध्ये सहा वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या विचार करणाऱ्या सगळ्यांनी एका वेळी एक या क्रमाने आपल्या डोक्यावर ठेवायच्या असतात. टोपी प्रत्यक्ष डोक्यावर न ठेवता देखील ती डोक्यावर ठेवली आहे अशी कल्पना करून विचार करता येतो. पहिली टोपी व्हाईट म्हणजे पांढरीशुभ्र. या टोपी खाली डोके असताना सर्वांनी फक्त दिलेल्या विषयावरील वस्तुस्थिती दर्शक सत्य माहिती मांडायची असते.यासाठी दिलेली माहिती पुराव्यानिशी द्यावी लागते.सर्व सदस्यांना असलेली माहिती एकत्र झाल्यावर टोपी बदलण्यात येते. दुसरी टोपी लाल भडक. या टोपी खाली डोके असताना ...
हा ब्लॉग विवेकी विचार करण्यास मदत करेल. तुम्हाला येथे विज्ञान, धर्म, राजकारण ह्याविषयी लेख वाचता येतील. - फ्रान्सिस आल्मेडा.