मुख्य सामग्रीवर वगळा

सिक्स थिंकिंग हॅट्स

एडवर्ड डी बोनो या  मनोवैज्ञानिकांने तयार केलेली चर्चा किंवा विचार करण्याची ही पद्धती  सिक्स थिंकिंग हॅट्स  नावाने ओळखली जाते. या पद्धतीमध्ये एकमेकाशी वादविवाद करणे किंवा दुसऱ्यांची मुद्दे खोडणे आणि त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यावर भर असतो. या पद्धतीने विचारविनिमय केल्यास आपण एकमेकांची मने न दुखावता कमीत कमी वेळात योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो असा डॉक्टर बोनो यांचा दावा आहे.
        या पद्धतीमध्ये सहा वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या विचार करणाऱ्या सगळ्यांनी एका वेळी एक या क्रमाने आपल्या डोक्यावर ठेवायच्या असतात. टोपी प्रत्यक्ष डोक्यावर न ठेवता देखील ती डोक्यावर ठेवली आहे अशी कल्पना करून विचार करता येतो.
      पहिली टोपी व्हाईट म्हणजे पांढरीशुभ्र. या टोपी खाली डोके असताना सर्वांनी फक्त दिलेल्या विषयावरील वस्तुस्थिती दर्शक सत्य माहिती मांडायची असते.यासाठी दिलेली माहिती पुराव्यानिशी द्यावी लागते.सर्व सदस्यांना असलेली माहिती एकत्र झाल्यावर टोपी बदलण्यात येते.
         दुसरी टोपी लाल भडक. या टोपी खाली डोके असताना फक्त आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. दिलेल्या विषयासंबंधी तुम्हाला वाटणाऱ्या भावना राग, प्रेम संताप, दुःख, सुख  आशा-निराशा इत्यादी. या व्यक्त करीत असताना कोणीही त्यावर आक्षेप घ्यायचा नाही मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करू द्यायच्या. सर्वांनी आपले मन मोकळे केल्यानंतर पुढच्या टोपीकडे वळावे.
       पुढची टोपी आहे काळी.या टोपी खाली डोके असताना चिकित्सा,टीका आणि परस्पर विरुद्ध मते मोकळेपणाने मांडावीत. त्यावर कोणीही आक्षेप घेऊ नये. कोणावरही व्यक्तिगत आरोप केले जाऊ नयेत. हे काम आटोपल्यावर पुढची टोपी डोक्यावर ठेवावी.
       चौथी टोपी आहे पिवळ्या रंगाची.या टोपी खाली डोके असताना फक्त सकारात्मक मुद्दे मांडावेत. दिलेल्या विषयातून कोणत्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत व होऊ शकतील यावर सर्व सदस्यांनी  आपले विचार व्यक्त करावेत. येथेदेखील कोणाचेही मत खोडून काढले जाऊ नये प्रत्येकाने आपल्या बाजूने सकारात्मक काय म्हणता येईल ते मांडत राहावे.
         पाचवी टोपी आहे हिरवी.या टोपी खाली डोके असताना सर्वांनी आपल्या विषयासंबंधी नवीन कल्पना आणि सर्जनशील विचार पुढे आणावेत. या कल्पना आणि विचार कितीही वेगळ्या वाटत असल्या तरी त्यावर आक्षेप घेऊ नये. सर्वांनी त्या शांतपणे ऐकून घ्याव्यात. त्यातून आपल्याला काही नवीन सुचत असल्यास पहावे.
       सहावी टोपी आहे निळी. या टोपी खाली डोके असताना अगोदर केलेल्या सर्व विचारावर प्रक्रिया केली जाईल. आपल्याला मिळालेली सत्य माहिती, तिच्या सबंधी भावना,तिच्यावरील आक्षेप, सकारात्मक गोष्टी आणि नवीन कल्पना आपल्यासमोर  असतील. त्यावरून शेवटच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्व सदस्यांनी मिळून करायचा आहे.
    आपणही आपल्या ग्रुप वर अशाच पद्धतीने विचार केल्यास तो अधिक कसदार होईल!

  
संदर्भ : Six Thinking Hats by Dr. Edward de bono.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलांवर संस्कार करतांना...

  सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात.       मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामक...

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...