मुख्य सामग्रीवर वगळा

एकटेपणा

मी एकटा आहे ही भावना प्रत्येक माणसात असते.ती घालवण्यासाठीच माणूस दुसऱ्यांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतो.त्यातूनच सण, समारंभ,कार्यक्रम व कर्मकांड निर्माण झाली आहेत. आईच्या गर्भात एका पेशीपासून आपली निर्मिती सुरू होते.आणि आपल्याला जाणीव होते तोपर्यंत आपला एकटेपणा स्पष्ट होत जातो.जन्माला येताना काही वेळा जुळे जन्माला येत असले तरी प्रत्येक जण एकटाच असतो.प्रथम आपल्या सोबतीला असते ती आपली आई.त्यानंतर येतात ते आपले बाबा.त्यानंतर भावंडे,मित्र, मैत्रिणी,बायको,मुले,नातवंडे व शेवटी आपण एकटेच सजीवता सोडून निर्जीवते कडे जातो. आपले माणूस म्हणून अस्तित्व संपते.आपल्या जवळच्या लोकांच्या सहवासात आयुष्यभर असलो तरीही आपला आतला एकटेपणा आपण टाळू शकत नाही.त्यासाठी आपण सोबतीला देवाला घेत असावे.कारण आपण आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या देवाला आपल्या आत घेऊ शकतो. म्हणजे देवावरील भक्ती एकटेपणा घालवण्याची एक युक्ती आहे. परंतु ती काल्पनिक गोष्ट आहे हे आपल्याला पूर्णपणे ठाऊक असते.ज्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याने व कल्पकतेने आपण आपल्या मनात देवाची निर्मिती करतो ती आपली प्रतिभा आपल्या सोबत आपल्या जाणिवेच्या काळात सतत असते.ही आपली प्रतिभा आपल्याला सतत सोबत करत असते. या प्रतिभेला आपण आपली आतली सोबत का मानू नये? ही आपली आतली प्रतिभा  आपल्या मानवी संस्कृतीचे संचित असून तिचा काही भाग आपल्या जनुकांमध्ये ही असतो. आपण हसायला,बोलायला व चालायला सहजपणे शिकतो. याची नोंद आपल्या 
जणुकांत असते. आपल्या पूर्वजांनी मिळवलेले ज्ञान आपल्याला आपल्या ज्येष्ठांकडून मौखिक स्वरूपात किंवा पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध असते. आपला मेंदू जोपर्यंत शाबूत असतो तोपर्यंत आपल्याला एकटेपणाची जाणीव असते आणि त्याच काळात आपली बुद्धी व प्रतिभा जागृत असते. मेंदूचे कार्य थांबले की आपल्या जाणिवेच्या अंता बरोबरच एकटेपणाची भावना ही नाहीशी होते. जिवंत असताना आपण सतत आपल्या  प्रतिभेची सोबत केली पाहिजे म्हणजे आपला एकटेपणा नाहीसा होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्य...