अमेरिकेत आपल्यासारखी इयत्तेप्रमाणे व विषयाप्रमाणे पाठ्यपुस्तके नसतातच त्याऐवजी तेथे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षक विषयाप्रमाणे साहित्य तयार करतात व वाचनालयातील पुस्तकाची मदत घेतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकाचे वजन नसते. तसेच पालकांसाठी गृह पाठाची दगदग नसते. खाजगी ट्युशन क्लासही नसतात! आणि विशेष म्हणजे बहुतेक सर्व शाळा सरकारीच असतात आणि त्या सर्वात जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत देतात. हे मी अनुभवलेले आहे!
आपल्या देशात तीन ते चार कोटी विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. त्यांची पाठ्यपुस्तके साधारणपणे प्रत्येक इयत्तेच्या वेगवेगळ्या विषयाची सरासरी पाच धरली तर 20 कोटीच्यावर होतील! एवढी पुस्तके प्रत्येक वर्षी बाद होतात! या पुस्तकांचा खर्च सरकार करते, किंवा पालकांना करावा लागतो, त्याऐवजी तोच खर्च वाचनालयात सुधारणा करण्यासाठी आणि शिक्षक व विद्यार्थी यांचे गुणोत्तर प्रमाणात ठेवण्यासाठी करता आला असता. आपल्या देशातील पाठ्यपुस्तके स्वयं शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय निकृष्ट आहेत असे यशपाल कमिशनने देशातील सर्वेक्षणावरून नमूद करून ठेवले आहे! तरीही आम्ही भारतीय पुस्तकाशिवाय शालेय शिक्षणाची कल्पना देखील आपण करू शकत नाही हा प्रचंड विरोधाभास नाही का?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा