जीवंत मानवी देवांचे तीर्थक्षेत्र… आनंदवन ,हेमलकसा आणि सोमनाथ बंधन टूरच्या आनंद वारी सोबत आम्ही या तीर्थक्षेत्राची सहल करुन आलो. आनंदवन म्हणजे भूतकाळावर मात, लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे वर्तमानकाळाला साथ आणि सोमनाथ प्रकल्प म्हणजे भविष्य काळाला हात! आनंदवन,वरोरा महारोगाने विद्रूप झालेल्या मानवी देहातील चैतन्य कामाला लावून फुलवलेले नंदनवन! या नंदनवनाचा आद्यमाळी महामानव मानवी देहातील देव बाबा आमटे! समाजाने तिरस्काराने टाकून दिलेले बेवारस मानवी जीव सन्मानाने उभे करण्याचे काम बाबांनी केले. शेती,बागा,हस्तकलाकेंद्र,हातमाग,यंत्रमाग,तांत्रिक कार्यशाळा, शाळा व कॉलेजे एक स्वयंपूर्ण वसाहत जी बाहेरच्या जगाला विविध उत्पादने पुरविते. हाताला बोटे नसलेले लोक निरोगी लोकांना तोंडात बोट घालायला लावणारी काम करीत आहेत! ज्यांची बोटे रोगाने हिरावून घेतली आहेत असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे...
हा ब्लॉग विवेकी विचार करण्यास मदत करेल. तुम्हाला येथे विज्ञान, धर्म, राजकारण ह्याविषयी लेख वाचता येतील. - फ्रान्सिस आल्मेडा.