चंद्रकांत वानखडे यांच्या 'आपुला चि वाद आपणांसी' हे आत्मकथन हे एका प्रामाणिक कार्यकर्त्यांचे पारदर्शक असे जीवन चरित्र आहे. कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगता केवळ समाजसेवेच्या तळमळीने केलेले कार्य किती प्रभावी असू शकते याचे दर्शन या चरित्रातून घडते.अनेक अडचणीला तोंड द्यावे लागले आणि कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुख सुविधा मिळवता आल्या नाहीत तरीही आत्मिक समाधानाने कसे जीवन जगता येते हे चंद्रकांत वानखेडे यांच्या जीवनावरून दिसते.त्यांच्या चरित्रातील मला आवडलेला एक प्रसंग त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे....... एकदा मी व माया गावावरून यवतमाळला जाणार्या बस मध्ये बसलो. यवतमाळच्या दिशेने बस धावत होती.मधल्या एका स्टॉपवर बस थांबली. बसमध्ये तीन नवीन प्रवासी चढले.एक गरोदर स्त्री,तिच्या सोबत एक म्हातारी,तिची सासू असावी व एक तरुण जो तिचा नवरा असावा.अत्यंत गरीब परिस्थितीतील ते असावेत हे तर त्यांच्या कपड्यावरून व सोबतच्या समानावरून स्पष्ट दिसत होते.बस मध्ये चढताच सर्वात समोरच्या आडव्या बेंचवर गरोदर स्त्री आडवी झाली.तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती.थोड्या वेळानंतर समोरच्या सीट वरील ...
हा ब्लॉग विवेकी विचार करण्यास मदत करेल. तुम्हाला येथे विज्ञान, धर्म, राजकारण ह्याविषयी लेख वाचता येतील. - फ्रान्सिस आल्मेडा.