मुख्य सामग्रीवर वगळा

अतिरेक्यांचे उगमस्थान ...

अतिरेक्यांच्या उगमापाशी जाऊन त्यांची दिशा बदलायला हवी. कोणताही धर्म अतिरेक्यांना प्रोत्साहन देत नाही असे म्हटले जाते.परंतु अतिरेक्यांच्या ह्रदयाशी धार्मिक भावना असतात हे उघड सत्य आहे. त्यामुळे अतिरेक्यांच्या बंदोवस्तासाठी धार्मिक भावनांचा तळ गाठला पाहिजे.
  धार्मिक भावनांचा उगम धार्मिक मिथक्कथांतून होतो. या मिथकांचे अर्थ लावण्याचे काम त्यात्या धर्माच्या धर्मगुरुंनी केलेले असते. आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ,दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांना नष्ट करणे हे पुण्याचे काम, आपल्या लोकांची संख्या वाढवली व दुसऱ्यांची घटवली तर आपल्याला स्वर्गात उत्तम स्थान मिळते वगैरे कल्पना भाविकांच्या डोक्यात घातल्यावर त्याला अतिरेकाची फळे येतात. शेवटी ह्या अतिरेक्यांच्या कोपाला आपलेच लोक बळी पडायला लागले तरी या धर्मगुरुंना हे कसे झाले याचा उलगडा होत नाही. यासाठी सर्व धर्माच्या धर्मगुरुंचे प्रबोधन होणे जरूर आहे.
       माजी राष्ट्रपती स्व. डॉ. कलाम यांनी सर्व धर्माच्या धर्मगुरुंच्या मुलाखती घेऊन काही सर्वसामान्य तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पद्धतीने समाज शास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक व धर्मगुरुंचा एक अभ्यास गट तयार करुन सर्व धार्मिक कथांचा अर्थ आपल्या देशाच्या संस्कृतीशी व लोकशाहीशी सुसंगत कसा करता येईल हे पहायला हवे. तरच धर्म समाजाची धारणा करणारे होतील!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलांवर संस्कार करतांना...

  सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात.       मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामक...

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...