मुख्य सामग्रीवर वगळा

भक्त आणि अनुयायी

थोर पुरुषांचे भक्त होणे ही सोपी गोष्ट आहे.  अनुयायी होणे ही कठीण गोष्ट आहे त्यामुळे थोर पुरुषाला भक्त भरपूर असतात परंतु अनुयायी फारच थोडे असतात!
     भक्त हे थोर पुरुषाची प्रतिमा किंवा मूर्ती तयार करून  तिची पूजा करतात तर अनुयायी त्यांच्या विचाराप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.
      भक्त त्या थोर पुरुषाला देव बनवून त्याच्याकडे स्वत:साठी दया याचना करतात,तर अनुयायी त्या थोर पुरुषाचे विचार समाजासाठी कसे वापरता येतील हे पाहतात.
       भक्तांना त्या थोर पुरुषाचा अभिमान वाटतो तर अनुयायांना त्या थोर पुरुषाबद्दल आदर वाटतो.
        भक्तांना सर्वांनी आपल्या सारखेच भक्त व्हावे असे वाटते तर अनुयायांना, लोकांनी त्या थोर पुरुषाचे विचार समजून घ्यावेत असे वाटते.
       त्या थोर पुरुषावर कुणी टीका केली तर भक्त त्यांच्यावर तुटून पडतात तर अनुयायी त्या थोर पुरुषांच्या विचारातील त्रुटी समजून घेतात.           
       भक्तांच्या दृष्टीने तो थोर पुरुष त्यांचाच असतो तर अनुयायांच्या दृष्टीने तो थोर पुरुष सर्व समाजाचा असतो.
        भक्त हे भक्तीमध्ये आंधळे झालेले असतात तर अनुयायी हे अनुकरणाने डोळस झालेले असतात!
        *सगळे थोर पुरुष मानवतेच्या कल्याणाच्याच गोष्टी सांगतात म्हणून भक्तांची संख्या कमी होऊन अनुयायांची संख्या वाढेल तेव्हाच जगाचे कल्याण होईल!*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलांवर संस्कार करतांना...

  सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात.       मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामक...

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...