मुख्य सामग्रीवर वगळा

अन्न नासाडी

आपल्या घरांमध्ये आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवले गेल्यास,उरलेले टाकून दिले जाते. लग्न समारंभात किंवा तशाच मोठ्या कार्यक्रमात खूप वाढलेले अन्न न संपल्यामुळे कचराकुंडीत टाकले जाते. अशाप्रकारे फेकून दिलेले अन्न पशु, पक्षी, कुत्री, मांजरे व किडे मुंग्या खातात, तर मग ते वाया जाते असे कसे म्हणता येईल?
            इतर जीवांनी त्या  अन्नावर उपजीविका करणे म्हणजे त्या अन्नाची विल्हेवाट लावणे होय! तो त्या अन्नाचा उपयोग नाही. ते अन्न शिजवून मानवी जीवनासाठी तयार केलेले असते ते फेकून देण्याची वेळ येणे म्हणजेच ते अन्न वाया घालवणे किंवा नासाडी करणे होईल.निसर्गातील पशुपक्षी किडेमुंग्या हे आपल्या फेकून दिलेल्या अन्नावर जगत नसून निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या अन्नाचा उपयोग करून निसर्गाचे चक्र सुरू ठेवण्याचे काम करतात. माणसाच्या खाण्या-पिण्याचा त्या चक्रातील त्यांच्या जगण्याशी संबंध येतो तेवढाच!
           अन्न, पाणी व हवा ही राष्ट्रीय संपत्ती आहे.या संपत्तीचा योग्य वापर न केल्यामुळे आपलेच काही भाऊबंद अन्न पाण्याअभावी प्रदूषित हवे मुळे नीटपणे जगू शकत नाहीत. त्यांचा योग्य प्रमाणे वापर करणे ही जबाबदारी आपण मानणे हा मानवी संस्कृतीचा भाग आहे.
           या प्रश्नाची दुसरी बाजू, आपल्या शहरात वाढणारी भटक्या कुत्र्यांची संख्या आपण फेकून दिलेल्या अन्नामुळे वाढत असते हे आपल्या लक्षात येत नाही. अन्नधान्य व्यवस्थित न ठेवल्यामुळे उंदरांची संख्या वाढते. सांडपाण्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे डासांची संख्या वाढते. त्यानंतर कुत्री, उंदीर व डास यांच्यावर आणि त्यापासून होणाऱ्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतो. अन्न, पाणी व हवा यांचे योग्य वापर व्यवस्थापन केल्यास असे अनेक प्रश्न सुटू शकतात!
             

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलांवर संस्कार करतांना...

  सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात.       मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामक...

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...