मुख्य सामग्रीवर वगळा

विवेक एक चिंतन...

विवेक एक चिंतन...
मित्रांनो,आपण सर्व विवेकाचे विद्यार्थी आहोत. आपण विवेक शिकत आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून योग्य काय ते शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.संपूर्ण मानव जात आज अभूतपूर्व अशा संकटाशी सामना करीत आहे. काही देश पूर्णपणे हतबल झालेले आहेत. आपल्या देशाच्या उंबरठ्यावर हा वनवा येऊन ठेपलेला आहे. अशावेळी विवेकाची खरी गरज आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे ही आपली पहिली गरज आहे.आपणा सर्वांना याची अंतकरणापासून जाणीव आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण विवेकावर चिंतन करणे आवश्यक आहे.

विवेकाचा अर्थ काय?

   सोक्रेटीस हा एक विवेकी तत्त्वज्ञ.त्यांनी स्वतःविषयी म्हटले, "मला काहीच समजले नाही एवढेच मला समजले आहे" सॉक्रेटीसांचे हे उद्गार म्हणजे विवेकाचा पाया आहे.आज मी असे बोलतो की जणू काही मला सर्व समजले आहे. साक्रेटीसांच्या समकालीन गौतम बुद्ध म्हणतात,"तुम्ही स्वतःचे दीप व्हा. कोणत्याही महापुरुषांवर किंवा महान ग्रंथावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका.स्वतः विचार करा."  हा विवेकाचा दुसरा विचार. आज मी स्वतः विचार करतो का?माझे सगळे बोलणे दुसऱ्याकडून घेतलेल्या माहितीवर आधारलेले असते. खऱ्याखोट्याचा शोध न घेता,स्वतः विचार न करता मी माझेच तेवढे खरे असे सांगत असतो. बुद्धानंतर ख्रिस्त आले. एका असहाय्य बाईवर दगडफेक करणाऱ्या जमावाला ख्रिस्ताने सांगितले, "तुमच्यापैकी ज्यांनी कोणताच गुन्हा केलेला नाही, त्याने पहिला दगड मारा" सगळे दगड गळून पडले. मीदेखील दुसऱ्याला गुन्हेगार ठरवतो. लोकांच्या चुका शोधतो. परंतु माझी काही चूक होते हे माझ्या लक्षात येत नाही. त्यानंतर गांधीजींनी सांगितले,"जो बदल तुम्हाला दुसऱ्या मध्ये हवा आहे तो स्वतःमध्ये करा." मी माझ्या मध्ये कोणताच बदल करू इच्छित नाही. कोणी काय करावे ते सगळ्या जगाला सांगत सुटतो. 
   आपल्या ग्रुप वरील चर्चेच्या दरम्यान या चारही विचारांना मी संपवून टाकतो.
         साक्रेटीस,बुद्ध,ख्रिस्त आणि गांधी यांचे हे चार विचार विवेकाचा पाया आहेत असे मला वाटते. ते ज्याच्या आचरणात आहेत तो विवेकी होय!
      सर्वांना वाटते की विवेकी म्हणजे सर्वज्ञ! स्वतःला विवेकी समजणारेही असेच समजतात. पण तोच त्यांचा अविवेक ! विवेकी आपले तेच खरे असे समजत नाही.दुसऱ्याचेही विचार समजून घेतो. आपल्यासारखे दुसऱ्याला मत असते. आणि ते आपल्यापेक्षा वेगळेही असू शकते हे त्याला समजते.मते खरी किंवा खोटी नसतात.वस्तुस्थिती आणि मते याच्यातील फरक तो जाणतो. वस्तुनिष्ठ निरीक्षणातून वस्तुस्थिती कळते. तरीही ती सत्य असतेच असे नाही.कारण निरीक्षक हा एक विशिष्ट मत असलेला माणूस असतो. विवेकाचे सामर्थ्य वस्तुस्थितीच्या ज्ञानात असते. त्यामुळे आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रिया मार्फत मिळणाऱ्या वस्तू स्थितीच्या ज्ञानावर आधारित विवेक कार्य करतो.अनेक माणसानी निरीक्षण करून केलेल्या विचारातून विवेक समृद्ध होतो. म्हणून विवेक ही वैयक्तिक बाब नसून ते सामुहिक सामर्थ्य आहे. त्यासाठीच विचार करणाऱ्या गटांची थिंक टॅंकची गरज असते. 
          विज्ञानाच्या विकासाबरोबर विवेकाची वाढ झाली आहे. विज्ञानाने आणलेली निरीक्षणाची साधने(टेलिस्कोप,मायक्रोस्कोप इत्यादी) ज्ञानेंद्रियांच्या सामर्थ्यात वाढ करून देणारी आहेत.त्यामुळे वस्तुस्थितीचे ज्ञान वाढले. विवेक अधिक प्रगल्भ झाला. वैज्ञानिक पद्धतीने काम करण्याने वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण झाला.त्यामुळे व्यक्तिनिरपेक्ष निरीक्षणे करण्याची माणसाची क्षमता वाढली. केवळ निसर्गात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करूनच ज्ञान मिळवण्या  ऐवजी प्रयोग करून अधिक जलद पद्धतीने ज्ञान मिळवता येऊ लागले. त्यामुळेच विज्ञानाच्या विकासाबरोबरच विवेकाचा प्रसार वाढला. वैज्ञानिक पद्धती सर्व क्षेत्रांमध्ये सर्रास वापरली जाऊ लागली. विवेका मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक  महत्वाची भूमिका बजावू लागला.आता तर असे म्हणता येईल की, 
          विवेक म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन वापरून मानवी वेदना कमी करणारी कृती देणारा विचार  होय!
      
    या विवेकाच्या समर्थ्यानेच आपण सर्व संकटावर मात करून साऱ्या मानव समाजाला सुखी व संपन्न करूया!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्य...