मुख्य सामग्रीवर वगळा

दिल्लीची दंगल

दिल्लीमध्ये झालेल्या दंगली पन्नाच्यादरम्यान अनेक लोकांचे प्राण गेले,दोनशेच्यावर लोक जखमी झाले आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली.या दंगलीत सरकारची आणि पोलिसांची भूमिका संदिग्ध होती.या दंगली घडवून आणल्या जातात असे अनेक पत्रकारांचे मत आहे.लोकांना देखील हे हळूहळू कळायला लागले आहे. या दंगलीमध्ये असे दिसून येते की जाळपोळ करणारे लोक बाहेरून आलेले असतात. शेजारी-शेजारी राहणारे लोक एकमेकांना मदत करतात.दुसर्‍या धर्माच्या धार्मिक स्थळांना देखील संरक्षण देतात.दुसऱ्या धर्माच्या  लोकांना आणि मालमत्तेला वाचवण्याचा प्रयत्न करतात. दिल्लीमधल्या आहे का मोहिंदर नावाच्या गृहस्थाने आणि त्याच्या मुलाने अनेक मुस्लिम बांधवांना वाचवले.प्रत्येक धर्माच्या लोकांनी दुसर्‍या धर्माच्या आपल्या शेजाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बाहेरून येणाऱ्या भाडोत्री दंगलखोर लोकांना रोखण्यासाठी एकत्र राहणाऱ्या लोकांनी स्वयंसेवकांची दले निर्माण करायला हवी.अशा स्वयंसेवी दलामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन ज्या प्रमाणे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी धावतात, त्याप्रमाणे अशा मानवनिर्मित आपत्तीमध्ये देखील मदतीचा हात द्यायला सुरुवात केली तर दंगलखोरांना नक्कीच रोखता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...

पाठ्यपुस्तके आणि वाचनालय

          अमेरिकेत आपल्यासारखी इयत्तेप्रमाणे व विषयाप्रमाणे पाठ्यपुस्तके नसतातच त्याऐवजी तेथे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षक विषयाप्रमाणे साहित्य तयार करतात व वाचनालयातील  पुस्तकाची मदत घेतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकाचे वजन नसते. तसेच पालकांसाठी गृह पाठाची दगदग नसते. खाजगी ट्युशन क्लासही नसतात! आणि विशेष म्हणजे बहुतेक सर्व शाळा सरकारीच असतात आणि त्या सर्वात जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत देतात. हे मी अनुभवलेले आहे!                     आपल्या देशात तीन ते चार कोटी विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. त्यांची पाठ्यपुस्तके साधारणपणे प्रत्येक इयत्तेच्या वेगवेगळ्या विषयाची सरासरी पाच धरली तर 20 कोटीच्यावर होतील! एवढी पुस्तके प्रत्येक वर्षी बाद होतात! या पुस्तकांचा खर्च सरकार करते, किंवा पालकांना करावा लागतो, त्याऐवजी तोच खर्च वाचनालयात सुधारणा करण्यासाठी आणि शिक्षक व विद्यार्थी यांचे गुणोत्तर प्रमाणात ठेवण्यासाठी करता आला असता. आपल्या देशातील पाठ्यपुस्तके स्वयं शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय निकृष्...