थोर पुरुषांचे भक्त होणे ही सोपी गोष्ट आहे. अनुयायी होणे ही कठीण गोष्ट आहे त्यामुळे थोर पुरुषाला भक्त भरपूर असतात परंतु अनुयायी फारच थोडे असतात! भक्त हे थोर पुरुषाची प्रतिमा किंवा मूर्ती तयार करून तिची पूजा करतात तर अनुयायी त्यांच्या विचाराप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. भक्त त्या थोर पुरुषाला देव बनवून त्याच्याकडे स्वत:साठी दया याचना करतात,तर अनुयायी त्या थोर पुरुषाचे विचार समाजासाठी कसे वापरता येतील हे पाहतात. भक्तांना त्या थोर पुरुषाचा अभिमान वाटतो तर अनुयायांना त्या थोर पुरुषाबद्दल आदर वाटतो. भक्तांना सर्वांनी आपल्या सारखेच भक्त व्हावे असे वाटते तर अनुयायांना, लोकांनी त्या थोर पुरुषाचे विचार समजून घ्यावेत असे वाटते. त्या थोर पुरुषावर कुणी टीका केली तर भक्त त्यांच्यावर तुटून पडतात तर अनुयायी त्या थोर पुरुषांच्या विचारातील त्रुटी समजून घेतात. ...
हा ब्लॉग विवेकी विचार करण्यास मदत करेल. तुम्हाला येथे विज्ञान, धर्म, राजकारण ह्याविषयी लेख वाचता येतील. - फ्रान्सिस आल्मेडा.