मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!
अलीकडील पोस्ट

आवडलेली पुस्तके.. आपुलाची वाद आपणासी

चंद्रकांत वानखडे यांच्या 'आपुला चि वाद आपणांसी' हे आत्मकथन हे एका प्रामाणिक कार्यकर्त्यांचे पारदर्शक असे जीवन चरित्र आहे. कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगता केवळ समाजसेवेच्या तळमळीने केलेले कार्य किती प्रभावी असू शकते याचे दर्शन या चरित्रातून घडते.अनेक अडचणीला तोंड द्यावे लागले आणि कोणत्याही प्रकारच्या भौतिक  सुख सुविधा मिळवता आल्या नाहीत तरीही आत्मिक समाधानाने कसे जीवन जगता येते हे चंद्रकांत वानखेडे यांच्या जीवनावरून दिसते.त्यांच्या चरित्रातील मला आवडलेला एक प्रसंग त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे.......    एकदा मी व माया गावावरून यवतमाळला जाणार्‍या बस मध्ये बसलो. यवतमाळच्या दिशेने बस धावत होती.मधल्या एका स्टॉपवर बस थांबली. बसमध्ये तीन नवीन प्रवासी चढले.एक गरोदर स्त्री,तिच्या सोबत एक म्हातारी,तिची सासू असावी व एक तरुण जो तिचा नवरा असावा.अत्यंत गरीब परिस्थितीतील ते असावेत हे तर त्यांच्या कपड्यावरून व सोबतच्या समानावरून स्पष्ट दिसत होते.बस मध्ये चढताच सर्वात समोरच्या आडव्या बेंचवर गरोदर स्त्री आडवी झाली.तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती.थोड्या वेळानंतर समोरच्या सीट वरील सभ्य क

तीर्थक्षेत्र

जीवंत मानवी देवांचे तीर्थक्षेत्र… आनंदवन ,हेमलकसा आणि सोमनाथ बंधन टूरच्या आनंद वारी सोबत आम्ही या तीर्थक्षेत्राची सहल करुन आलो. आनंदवन म्हणजे भूतकाळावर मात, लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे वर्तमानकाळाला साथ आणि सोमनाथ प्रकल्प म्हणजे भविष्य काळाला हात! आनंदवन,वरोरा         महारोगाने विद्रूप झालेल्या मानवी देहातील चैतन्य कामाला लावून फुलवलेले नंदनवन! या नंदनवनाचा आद्यमाळी महामानव मानवी देहातील देव बाबा आमटे! समाजाने तिरस्काराने टाकून दिलेले बेवारस मानवी जीव सन्मानाने उभे करण्याचे काम बाबांनी केले. शेती,बागा,हस्तकलाकेंद्र,हातमाग,यंत्रमाग,तांत्रिक कार्यशाळा, शाळा व कॉलेजे एक स्वयंपूर्ण वसाहत जी बाहेरच्या जगाला विविध उत्पादने पुरविते. हाताला बोटे नसलेले लोक निरोगी लोकांना तोंडात बोट घालायला लावणारी काम करीत आहेत!                              ज्यांची बोटे रोगाने हिरावून घेतली आहेत असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे रोगमुक्त महारोगी घेऊन वरोऱ्याच्या उजाड माळरानावर बाबांनी पहिली झोपडी उभारली.आज तेथे रोगमुक्त महारोग्याची स्वयंपूर्ण वसाहत आत्मविश्वाने उभी आहे.बाबांनी ही माणसे केवळ रोगमुक्तच केली नाह

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा

सामाजिक चिंतन

  धर्म आणि विज्ञान ही दोन्ही मानवी प्रज्ञेची अपत्ये आहेत. प्रज्ञेचा विकास झाल्यामुळे मानवास, भूत-भविष्याची जाणीव, अज्ञाताची भीती, मृत्यूची भीती, सभोवतालच्या निसर्गाची भयावह अभिव्यक्ती व सर्व गोष्टींचे नियमन-निर्मिती ह्याविषयीचे प्रश्न पडण्यास सुरवात झाली. परंतु ह्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याएवढे ज्ञान मात्र मानवाकडे नव्ह्ते. त्यावेळी धर्माने बाळबोध उत्तरे पुरवत त्याची जिज्ञासा पूर्ती करण्याचा प्रयत्न केला. पुढे हळूहळू मानवी निरीक्षण शक्ती व तर्कशक्ती प्रबळ होत गेली आणि विज्ञानाचा विकास सुरु झाला. ज्या  प्रश्नांची उत्तरे धर्माने कल्पनेने दिली होती ती विज्ञानाने प्रत्यक्ष पुराव्यांच्या  आधारे द्यायला सुरुवात केली. परंतु धर्माने पुरवलेला मानसिक आधार देणे विज्ञानाला अजून जमलेले नाही. त्यामुळेच आजतागायत धर्म टिकून आहे.   धर्म टिकून राहण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. १) अज्ञाताच्या भीतीवर सोपे तोडगे २) सुखी जीवन जगण्याचे सोपे मार्ग ३) जीवनातील दुखांतून मुक्ती व मोक्षाचा मार्ग ४) मृत्यू नंतरच्या जीवनाचे व आत्म्याच्या अमरत्वाचे आश्वासन ५) मानवाच्या व विश्वाच्या निर्मितीचे हेत

विवेक एक चिंतन...

विवेक एक चिंतन... मित्रांनो,आपण सर्व विवेकाचे विद्यार्थी आहोत. आपण विवेक शिकत आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून योग्य काय ते शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.संपूर्ण मानव जात आज अभूतपूर्व अशा संकटाशी सामना करीत आहे. काही देश पूर्णपणे हतबल झालेले आहेत. आपल्या देशाच्या उंबरठ्यावर हा वनवा येऊन ठेपलेला आहे. अशावेळी विवेकाची खरी गरज आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे ही आपली पहिली गरज आहे.आपणा सर्वांना याची अंतकरणापासून जाणीव आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण विवेकावर चिंतन करणे आवश्यक आहे. विवेकाचा अर्थ काय?    सोक्रेटीस हा एक विवेकी तत्त्वज्ञ.त्यांनी स्वतःविषयी म्हटले, "मला काहीच समजले नाही एवढेच मला समजले आहे" सॉक्रेटीसांचे हे उद्गार म्हणजे विवेकाचा पाया आहे.आज मी असे बोलतो की जणू काही मला सर्व समजले आहे. साक्रेटीसांच्या समकालीन गौतम बुद्ध म्हणतात,"तुम्ही स्वतःचे दीप व्हा. कोणत्याही महापुरुषांवर किंवा महान ग्रंथावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका.स्वतः विचार करा."  हा विवेकाचा दुसरा विचार. आज मी स्वतः विचार करतो का?माझे सगळे बोलणे दुसऱ्याकडून घेतलेल्या म

सिक्स थिंकिंग हॅट्स

एडवर्ड डी बोनो या  मनोवैज्ञानिकांने तयार केलेली चर्चा किंवा विचार करण्याची ही पद्धती  सिक्स थिंकिंग हॅट्स   नावाने ओळखली जाते. या पद्धतीमध्ये एकमेकाशी वादविवाद करणे किंवा दुसऱ्यांची मुद्दे खोडणे आणि त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यावर भर असतो. या पद्धतीने विचारविनिमय केल्यास आपण एकमेकांची मने न दुखावता कमीत कमी वेळात योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो असा डॉक्टर बोनो यांचा दावा आहे.         या पद्धतीमध्ये सहा वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या विचार करणाऱ्या सगळ्यांनी एका वेळी एक या क्रमाने आपल्या डोक्यावर ठेवायच्या असतात. टोपी प्रत्यक्ष डोक्यावर न ठेवता देखील ती डोक्यावर ठेवली आहे अशी कल्पना करून विचार करता येतो.       पहिली टोपी व्हाईट म्हणजे पांढरीशुभ्र. या टोपी खाली डोके असताना सर्वांनी फक्त दिलेल्या विषयावरील वस्तुस्थिती दर्शक सत्य माहिती मांडायची असते.यासाठी दिलेली माहिती पुराव्यानिशी द्यावी लागते.सर्व सदस्यांना असलेली माहिती एकत्र झाल्यावर टोपी बदलण्यात येते.          दुसरी टोपी लाल भडक. या टोपी खाली डोके असताना फक्त आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. दिलेल्या विषयासंबंधी तुम्हाला वाट

मुलांवर संस्कार करतांना...

  सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात.       मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामकारकपणे करता येतील.

पाठ्यपुस्तके आणि वाचनालय

          अमेरिकेत आपल्यासारखी इयत्तेप्रमाणे व विषयाप्रमाणे पाठ्यपुस्तके नसतातच त्याऐवजी तेथे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षक विषयाप्रमाणे साहित्य तयार करतात व वाचनालयातील  पुस्तकाची मदत घेतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकाचे वजन नसते. तसेच पालकांसाठी गृह पाठाची दगदग नसते. खाजगी ट्युशन क्लासही नसतात! आणि विशेष म्हणजे बहुतेक सर्व शाळा सरकारीच असतात आणि त्या सर्वात जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत देतात. हे मी अनुभवलेले आहे!                     आपल्या देशात तीन ते चार कोटी विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. त्यांची पाठ्यपुस्तके साधारणपणे प्रत्येक इयत्तेच्या वेगवेगळ्या विषयाची सरासरी पाच धरली तर 20 कोटीच्यावर होतील! एवढी पुस्तके प्रत्येक वर्षी बाद होतात! या पुस्तकांचा खर्च सरकार करते, किंवा पालकांना करावा लागतो, त्याऐवजी तोच खर्च वाचनालयात सुधारणा करण्यासाठी आणि शिक्षक व विद्यार्थी यांचे गुणोत्तर प्रमाणात ठेवण्यासाठी करता आला असता. आपल्या देशातील पाठ्यपुस्तके स्वयं शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय निकृष्ट आहेत असे यशपाल कमिशनने देशातील सर्वेक्षणावरून नमूद करून ठेवले आहे! तरीही आम्ह

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्या ज्ञानाने आक