विवेक एक चिंतन... मित्रांनो,आपण सर्व विवेकाचे विद्यार्थी आहोत. आपण विवेक शिकत आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून योग्य काय ते शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.संपूर्ण मानव जात आज अभूतपूर्व अशा संकटाशी सामना करीत आहे. काही देश पूर्णपणे हतबल झालेले आहेत. आपल्या देशाच्या उंबरठ्यावर हा वनवा येऊन ठेपलेला आहे. अशावेळी विवेकाची खरी गरज आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे ही आपली पहिली गरज आहे.आपणा सर्वांना याची अंतकरणापासून जाणीव आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण विवेकावर चिंतन करणे आवश्यक आहे. विवेकाचा अर्थ काय? सोक्रेटीस हा एक विवेकी तत्त्वज्ञ.त्यांनी स्वतःविषयी म्हटले, "मला काहीच समजले नाही एवढेच मला समजले आहे" सॉक्रेटीसांचे हे उद्गार म्हणजे विवेकाचा पाया आहे.आज मी असे बोलतो की जणू काही मला सर्व समजले आहे. साक्रेटीसांच्या समकालीन गौतम बुद्ध म्हणतात,"तुम्ही स्वतःचे दीप व्हा. कोणत्याही महापुरुषांवर किंवा महान ग्रंथावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका.स्वतः विचार करा." हा विवेकाचा दुसरा विचार. आज मी स्वतः विचार करतो का?माझे सगळे बोलणे दुसऱ्याकडून घेतलेल्या म...
हा ब्लॉग विवेकी विचार करण्यास मदत करेल. तुम्हाला येथे विज्ञान, धर्म, राजकारण ह्याविषयी लेख वाचता येतील. - फ्रान्सिस आल्मेडा.